मंगळागौर रंगे..आनंद जेष्ठ नागरिक महिला संगे







मावळ मराठा न्युज नेटवर्क -आनंद जेष्ठ नागरिक संघ,पोस्टल कॉलनी वाकड,सांस्कृतिक मंडळ अंतर्गत महिला विभागातर्फे ‘मंगळागौर’ उत्सव मंगळवार दि १९ ऑगस्ट रोजी उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी सौ स्वाती कलाटे,माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड आणि महिला मंडळ प्रमुख अलका कळमकर यांच्या शुभ हस्ते गौरीपूजन करण्यात आले.त्यानंतर वैवाहिक जीवनात पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि समृद्ध सुखी संसारासाठी साजरा केला जाणाऱ्या या सणाची माहिती सौ चित्रा बरहाटे यांनी दिली. त्यानंतर मंगळागौरीसाठी खेळले जाणारे विविध पारंपरिक खेळ-विविध प्रकारच्या फुगड्या, झिम्मा, टिपऱ्या,पिंगा कळशी सूप घेऊन खेळले जाणारे खेळ स्वातीताई सोबत सामूहिकरीत्या खेळून सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. शेवटी स्वतीताईंचा सत्कार अलका कळमकर यांनी करून मंगळागौरीची आरती झाली.त्यानंतर अल्पोपहार गजवून कार्यक्रमाची सांगता झाली. सदरील कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समितीच्या सदस्या अलका कळमकर,चित्रा बरहाटे,हेमांगी बोंडे,मीरा बोरकर,पुष्पा ढवळे,निर्मला झोपे,संगीता साठे, प्रतिभा गवळे,हर्षाली देसाई यांनी महत्वाचे योगदान दिले त्यासाठी अध्यक्ष भागवत कोल्हे,सचिव सुरेश बोरकर खजिनदार माधव बरहाटे आणि प्रसिद्धी प्रमुख अशोक बोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.



