जाईआई फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा



मावळ मराठा न्युज नेटवर्क -आंबवणे येथे जगातीक महिला दिनाचे औचित्य साधून आंबवणे ता. मुळशी येथे माजी आदर्श सरपंच सौ. वत्सलाताई वाळंज यांच्या कल्पनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.या प्रसंगी स्नेह भोजन व विविध खेळ, नृत्य सादर करत अनेक महिलांनी उपस्थित्तांचे मन जिंकली आनंद साजरा केला. आंबवणे लोणावळा येथील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. आपल्या दैनंदिन जीवनात थकलेल्या मनाला आनंद मिळावा. मनसोक्त विचारांची देवघेब व्हावी.. या हेतूने मी या कार्यक्रमाचे आयोजन जाईआई फाउंडेशन च्या वतीने केले. असे सौ वत्सलाताई वाळंज म्हणाल्या.जिजाऊ पासून ते आज पर्यंत असंख्य महिलांची कर्तबगारी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. असेही त्या म्हणाल्या.. एका चिमुकली च्या हस्ते जागतिक महिला दिना निमित्ताने केक कापण्यात आला.अनेक महिलांनी पुढे येऊन आपली मनोगत व्यक्त केली.व आयोजनाबद्दल आभार मानले.स्नेह भोजन व नृत्य केल्यावर कार्यक्रम संपला.




