माउंटन सर्च ॲण्ड रेस्कु टिम ऑफ दि इअर या सन्मानाने शिवदुर्ग मित्र,लोणावळा, रेस्कु टीमचा गौरव


मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, कै.अविनाश जोशी स्मृतिप्रीत्यर्थ..पहिले .. सह्याद्री मित्र संमेलन ७ जुलै रोजी महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे संपन्न झाले, अनुभवी जेष्ठ गिर्यारोहक संजय अमृतकर (नाना ) सर्व नियोजन करत होते. संमेलन उत्तम व्हावे, सर्व समावेशक व्हावे, नाशिक पुन्हा नव्या जोमाने गिर्यारोहण, गिरीभ्रमण क्षेत्रात नावारुपाला यावे. यासाठी सर्व ताकद पणाला लावून अनेक दिग्गजांना एकत्र घेऊन संमेलनाची तयारी केली. नविन नविन कल्पना, वेगवेगळ्या क्षेत्रातील गडकोट, डोंगरदऱ्यात कामकरणाऱ्या व्यक्ती संस्था, लेखक यांचे एकत्रीकरण करुन नियोजन केले होते . अनेक जेष्ठ गिर्यारोहक, जेष्ठ लेखक यांना आग्रहाचे निमंत्रण दिलेले होते. जेष्ठ गिर्यारोहक लेखक हरिषजी कपाडिया, जेष्ठ लेखक आनंदजी पाळंदे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अनेक वर्षे वाटाडे म्हणून काम करणाऱ्या तरुणांचा सन्मानित केल्यामुळे ते सह्याद्री मध्ये आपूलकीने मदतीला येत राहतील हे नाना व सहकार्यांनी जानले होते. चांगले गिर्यारोहक, चांगले फोटोग्राफर, चांगले ब्लॉगर यांची संपूर्ण महाराष्ट्रातून माहिती मागितली होती व निवड प्रक्रिया करुन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. माऊंटन सर्च आणि रेस्कु टीम ऑफ दी इयर पुरस्कारासाठी शिवदुर्गची माहिती पाठवली होती. त्यातून शिवदुर्गला पुरस्कार जाहिर झाला… शिवदुर्ग गेली वीस वर्षे डोंगरदऱ्यात माउंटन सर्च आणि रेस्कु करीत आहे. पण अशा प्रकारचा *संपूर्ण महाराष्ट्रातून हा पहिलाच पुरस्कार होता. इतर शासकीय, सस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले पण ते त्या एका विशिष्ट रेस्कू साठीचे होते. पुरस्कार तर एक सदस्यांना उर्जा मिळण्यासाठी असते. पण सह्याद्री व हिमालयात काम करणारी दिग्गज मंडळींच्या भेटी गाठी , ओळखी पण होतात. अतिशय देखणा सोहळा संपन्न झाला. सह्याद्री मित्र संमेलनाच्या निमित्ताने” माउंटन सर्च ॲण्ड रेस्कु टिम ऑफ दि इअर ” या सन्मानाने शिवदुर्ग मित्र, लोणावळा, रेस्कु टीमला गौरवण्यात आले .२५००० /- रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. गिर्यारोहक प्रितीजी पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवदुर्गचे उपाध्यक्ष महेशजी मसने, सचिव सुनिल गायकवाड, संचालक राजेंद्र कडू, योगेशजी उंबरे , अनिलजी आंद्रे यांनी पुरस्कार स्वीकारला.




