मराठा बांधवांच्या शिक्षण व आर्थिक प्रगतीसाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महासभेला जाण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर प्रचार साहित्य वाटप केंद्राचे उद्घाटन – लोकसेवक युवराज दाखले.


मावळ मराठा न्यूज़ :- पुणे-१२/१० -२०२३ रोजी प्रतिनिधी, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा बांधव आपल्या पाल्याच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण मिळण्या कामी न्यायालयान व रस्त्यावरील लढाई लढत आहे.मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या १७ दिवस अमरण उपोषण समाजहितासाठी केले होते.त्याच धर्तीवर शनिवार दिनांक १४/१०/२०२३ रोजी आंतरवली सराटी, तालुका अंबड जिल्हा जालना याठिकाणी भव्य विराट महासभा आयोजित केली आहे.या महासभेला उपस्थित राहण्यासाठी प्रचार व प्रसार करण्याकरिता ना नफा ना तोटा या तत्वावर साहित्य विक्री केंद्र सर्वे नंबर ४७/२अ/१६ मोहम्मदवाडी ऐ वन पार्क, पुणे या ठिकाणी विक्री केंद्रांचे उद्घाटन सकल मातंग समाज समन्वयक तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या शुभहस्ते करण्यात आले,या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे, आण्णा भाऊ साठे, छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व इतर महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी ध्वज, गाण्यांच्या सिडी, पुस्तक,उपरणे विक्रीस ना नफा ना तोटा या तत्वावर असणार आहे तरी समाज बांधवांनी यांचा लाभ घ्यावा असे अहवान लोकसेवक युवराज दाखले यांनी केले.यावेळी ज्ञानगंगा मुक्ता ब्रिगेड प्रदेश अध्यक्षा तथा शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा संचिताताई गोसावी, मार्गदर्शक सचिन गोसावी,पायल रायकर ,जन्नथ शेख,हर्षाताई, सोनाली ताई, कविता ताई, तुळशी ताई आदी प्रमुख महिला भगिनींनी उपस्थित होत्या.




