श्रीमद् सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर,मारणेवाडी १४ विद्यार्थी,संगीत विशारद परीक्षेत प्रथम

मावळ मराठा न्यूज़ :- पुणे ,मुळशी तालुक्यातील ‘मारणेवाडी’ नावाचे गाव. तसे म्हटले तर आजही दुर्गम खेडे. या खेड्यातून व पंचक्रोशीतून शास्त्रीय संगीताची जोपासना व्हावी हे तसे म्हटले तर नवलच. श्रीमद् सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर,मारणेवाडी ही संस्था खेड्यांत शास्त्रीय संगीत जोपासण्याचे कार्य करते आहे. संस्थेचे संचालक ह. भ. प. जानकीराम जगताप, हे विद्यार्थ्यांना मोफत संगीताचे शिक्षण देतात. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या विद्यापीठ द्वारे एप्रिल मे २०२३ या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये.यावर्षी संस्थेचे तब्बल १४ विद्यार्थी, संगीत विशारद प्रथम, या परीक्षेत उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. एवढ्या खेड्यात शालेय शिक्षण, घरचे व शेतात काम सांभाळून या विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. संस्था अनेक विधायक उपक्रम विनामोबदला राबवत आहे. वाचन संस्कृती जोपासणे, राष्ट्रपुरुषांची चरित्रे, संतांची चरित्रे, इतिहास यांबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती देणे. संगीत कला शिकवणे. साधना करून घेणे. अभ्यास कसा करावा, आरोग्य कसे सांभाळावे, सामाजिक सलोखा, देशप्रेम, स्वच्छता, परोपकार आदी विषय विद्यार्थ्यांना शिकवले जातात.




