सणाचा खरा आनंद तेव्हाच,जेव्हा तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो – सुभाष डेनकर ; स्वच्छता कर्मचारी यांचेसोबत दिवाळी

मावळ मराठा न्युज – लोणावळा,आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वतःचे आयुष्य झोकून देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवेला मानाचा मुजरा! त्यांच्या मेहनती प्रती कृतज्ञता व्यक्त करत दिवाळीनिमित्त लोणावळा नगरपरिषदचे नगरसेवक सुभाष भाऊ डेनकर यांनी सर्वाना भेटवस्तू व फराळ देऊन आनंदाचा छोटासा क्षण साजरा केला.वलवण व नांगरगाव विभागातील सर्व सफाई कर्मचारी व मुकादम यांना दिवाळी पाडव्यानिमित्त नगरसेवक सुभाष डेनकर यांच्या वतीने अल्पोपहार व भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. स्वच्छता कर्मचारी हे खरे स्वच्छता
दूत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही तमा न बाळगता दररोज सकाळी प्रभागांमधील रस्ते व अंतर्गत भाग स्वच्छता करण्यांचे काम हे सफाई कर्मचारी करत असतात. प्रभागातील मुकादम हे देखील या कर्मचान्यांकडून योग्य प्रकारे सर्व भागाची स्वच्छता करून घेत असतात. अशा या स्वच्छता दूतांचा खन्या अर्थाने दिवाळीच्या सणाच्या निमित्त सन्मान करत त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या.वलवण व नांगरगाव विभागगतील सर्वच स्वच्छता कर्मचारी व मुकादम हे नियमित प्रभागांमध्ये स्वच्छता ठेवण्यांचे काम करत आहे. अशा या कर्मचान्यांची दिवाळी लोक प्रतिनिधींकडून गोड करण्यात आली. सध्या सर्वत्र दिवाळी उत्साहात सुरू आहे, नागरिक रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटांके वाजवतात व परिसरामध्ये सर्वत्र कचरा होत असतो. हा सर्व कचरा नागरिक उठण्यापूर्वी पहाटेपासूनचे स्वच्छता कर्मचारी गोळा करत संपूर्ण परिसर हा पुन्हा स्वच्छ करत असतात. वर्षभर त्यांचीही दिनचर्या सुरू असते. अशा या स्वच्छता दूतांचा हा छोटेखानी सन्मान असल्यांचे मत नगरसेवक सुभाष डेनकर यांनी साप्ताहिक मावळ नागरिक शी बोलताना व्यक्त केले.नगरसेवक सुभाष डेनकर यांनी वलवण व नांगरगाव विभागवतील सर्व सफाई कर्मचारी व मुकादमांचा केलेला हा सन्मान खरोखर कौतुकास्पद आहे. स्वच्छता दूतांच्या कामाचा गौरव करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.यावेळी नगरसेवक सुभाष डेनकर यांच्या समवेत त्यांचे बंधू संदीप डेनकर, शितल डेनकर, प्रिया डेनकर हे देखील उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page