सांगवी येथील जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दृष्टीदान सप्ताह संपन्न



मावळ मराठा न्यूज़ :- पिंपरी,(प्रतिनिधी) सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात कै डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदान सप्ताहास मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागामध्ये आयोजित सप्ताहाचे उदघाटनजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. १० ते १६ जूनपर्यंत हा सप्ताह साजरा करण्यात आला. या कालावधीमध्येजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दृष्टीदोष, काचबिंदू व इतर नेत्ररोग तपासणी व त्यावरील उपचार करण्यात आला. या साप्ताहात २६ बुबुळ संकलित केले, तर १०८ जणांनी नेत्रदानाचा संकल्प अर्ज भरला. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी तपासणी व उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी केले.तसेच नेत्रदानाबाबत जनजागृतीकरण्यात आली. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन आंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणू शकतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी नेत्रदानास प्रवृत्त व्हावे. असे आवाहन नेत्र विभाग प्रमुख डॉ. अंजली कुलकर्णी यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्स डॉ. वर्षा डोईफोडे, डॉ. प्रिया हरदास, डॉ. प्रज्ञा निकम, नोडल ऑफिसर शामराव राठोड, समन्वयक संतोष चव्हाण व रुग्णालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.




