प्राधिकरण निगडी येथे एक व्यक्त दलदलमधुन काढण्यात अग्निशामक दलातील वीरांना यश

मावळ मराठा न्यूज़ (प्रतिनिधि )पिंपरी चिचवड महानगर पालिका तील अग्निशमन दलातील वीराना मानाचा सलाम , श्री विशाल सावळे यांनी स्वतः फोन करून कळविले की मूकबधिर शाळा प्राधिकरण निगडी येथे एक व्यक्त दलदलमध्ये फसल्याची वर्दी दिली .सदर प्राधिकरण उप अग्निशमन केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.कर्मचारी श्री गौतम इंगवले( सब ऑफिसर), श्री संपत गौंड (लीडिंग फायरमन ),श्री प्रदीप हिले (वाहन चालक),श्री काशिनाथ ठाकरे (फायरमन),श्री अजय साळुंखे (ट्रेनी फायरमन)घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक व्यक्ती दलदल मध्ये ऋतून बसल्याचे आढळून आल त्यानुसार प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र तील कर्मचाऱ्यांनी सदर व्यक्तीस शिडी , दोर , सीलिंग हुक च्या साहाय्याने सदर ठिकाणी पोचून सदर व्यक्तीस सुखरूपपणे बाहेर काढले व त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन केले दल दल मधून सुटका केलेली व्यक्तीचे नाव श्री निळकंठ पाटील असून त्यांचे वय वर्ष ६५ अंदाजे आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page