एआयएस ड्रीम्झ व टॉपर्स स्पोर्ट्स क्लबच्या १८ खेळाडूंनी केला विश्वविक्रम



मावळ मराठा न्यूज :-पिंपरी,(प्रतिनिधी) बेळगांव (कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या १००मी फास्टेस्ट बॅकवार्ड्स ऑन स्केट्स युझिंग टू व्हील्स ७२ तास , अटेम्प्ट फॉर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम महोत्सवात पिंपळे सौदागर येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लब, एआयएस ड्रीम्झ व टॉपर्स स्पोर्ट्स क्लबच्या १८ स्केटींग खेळाडूंनी रेकॉर्ड ॲटेम्ट पूर्ण केला.या रेकॉर्ड साठी संपूर्ण देशभरातील सुमारे तीनशे खेळाडू सहभागी झाले होते. हे सर्व स्केटर्स पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल स्केटिंग ट्रॅक पिंपळे सौदागर व वाकड ताथवडे येथील अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ड्रीम्झ स्केटिंग क्लब रिंग व एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल रहाटणी स्केटिंग ट्रॅक येथे सराव करतात. ३१ मे ला संध्याकाळी वर्ल्ड रेकॉर्ड अटेंम्ट पूर्ण झाल. रेकॉर्ड अटेम्प्ट चालू असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तरीही खेळाडूंनी सलग दिवस रात्र ७२ तास स्केटिंग करून हा रेकॉर्ड अटेंम्ट यशस्वीपणे पूर्ण केला.सहभागी झालेल्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.१ .श्रीअंश विश्वकर्मा (जी. के. गुरुकुल स्कूल, पिंपळे सौदागर)२ अबीर अमित जाधव (अल्फोंसा हाय स्कूल, काळेवाडी, पिंपरी )३ आर्ष जितेंद्र कटके (ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल, ताथवडे) ४ .शौर्य निखिल पाटील (इंदिरा नॅशनल स्कूल, वाकड )५ मुकुला अमित इंगळे ( विद्या व्हॅली स्कूल नॉर्थ पॉईंट)६ अभिश्री संदेश भावके (७ स्वरनीम अलंकार सुर्वे८ हेज़ल जितेंद्र निर्वाणी ( जी. के. गुरूकुल स्कूल, पिंपले सौदागर)९ नव्या निलेश सेरीवाला ( एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल,रहाटणी)१० आध्या तुषार कुदळे. (जय हिंद हायस्कूल. पिंपरी)११ अर्णव कृष्णराज कलघटगी (दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर)१२ शोयब समीर मनेरी पाटील१३ शर्विल संकेत थत्ते ( वॉलनट स्कूल, वाकड )१४ कोयल संजय गायकवाड ( आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)१५ सना गायत्री (आर्मी पब्लिक स्कूल किरकी)१६ स्वप्नील संतोष सरवदे (आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)१७ ध्रुवराज सुभाष शिरसाठ (आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर)१८ गौरी सुनील दिघे (एस.एन.बी.पी ज्युनिअर कॉलेज रहाटणी) यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून महाराष्ट्राचे नाव उंचावले. वर्ल्ड रेकॉर्ड अटेंम्ट यशस्वीपणे पूर्ण होताच नाना काटे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल (नाना) काटे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच मागील आठवड्यात पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या उमेश काटे स्पोर्ट्स फाऊंडेशन व नाना काटे सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित दहा दिवसीय प्लेसको स्पोर्ट्स कार्निवलमध्ये क्लबच्या स्केटर्सनी २३ सुवर्ण, १५ रजत, व ११कांस्य पदके मिळवून पिंपरी-चिंचवडमध्ये क्लबचे नाव मोठे केले सर्वाधिक पदके मिळवून क्लब पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला.वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संघ व्यवस्थापक म्हणूनशशांक कुमार, कल्याणी इंगळे, प्रगती कुदळे यांनी काम बघितले तसेच सर्व स्पर्धकांना क्लबचे प्रशिक्षक वैभव बिळगी, राहुल बिळगी, वंदना बिळगी, सुरज दीक्षित, राजेश शर्मा आणि प्रिनाल शर्मा, यांचे मार्गदर्शन लाभले.




