*भोसरी गांवचे सुपुत्र पै. काळुराम लांडगे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक*

मावळ मराठा न्युज – पुणे – *दि.२५.०६.२०२६*कासारवाडीचे सुपुत्र गुणवंत कामगार पै. काळुराम लांडगे यांना पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा.श्री.जितेंद्र इंद्रा सहीराम डूडी यांच्या शुभहस्ते विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार गृहशाखा तथा जनमाहिती अधिकारी गृहशाखेच्या अधिकारी श्रीमती अर्पणा देशपांडे व वरिष्ठ लिपिक श्री अनिल पाटील उपस्थित होते.पै.काळुराम लांडगे हे ३८ वर्ष पीएमपीएमएल सेवेत कार्यरत होते. सुरुवातीला वाहक नंतर कट्रोलर-कम-चेकर म्हणून काम करत असताना प्रवाशांच्या बॅग,मोबाईल,पैशाचे पॉकेट तथा तत्सम प्रकारच्या मौल्यवान वस्तु ज्याचे त्यांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न करत असत. भोसरी बसस्थानकात काम करताना बसमध्ये प्रवाशांना रांगेत सोडणे,गरोदर महिला व जेष्ठ नागरिकांना पुढील दरवाजातुन प्रवेश देणे, पाकिटमार व बसस्थानकामध्ये मुलींच्या शाळेच्या वेळी रोडरोमियो यांच्यावर त्यांची फार मोठी करडी नजर होती.त्यामुळे तेथे त्यांचा खूप मोठा दरारा होता. अर्थात, ते शिस्तीचे भोक्ते आहेत. सर्व वाहक , चालक , कंट्रोलर,चेकर तसेच पीएमपीएमएलमधील सर्व अधिकारी, सर्व युनियन कर्मचारी यांच्याशी त्यांचा सुसंवाद असे.कोरोनाकाळातही त्यांनी अचुक सेवा दिली.ह्या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सन २०१९ चा “गुणवंत कामगार पुरस्कार” कामगार मंत्री मा.श्री.हसनजी मुश्रीफ व कामगार राज्य मंत्री मा.श्री.बच्चु कडु यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. पै. काळुराम लांडगे यांचे धार्मिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, पर्यावरण, राजकिय, पत्रकारिता, उद्योग,आरोग्य,कृषी अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे .जीवनाचा खरा अर्थ संपत्ती जमवण्यात नसुन माणुसकी, प्रेम आणि सत्कर्म करण्यात आहे. पैसा,घर ,गाडी,जडजवाहीर हे सर्व इथेच राहुन जातात . मात्र आपल्या वागण्याने जिंकलेली माणसं, दिलेला आधार, केलेले सत्कर्म आणि जपलेली नाती कायम स्मरणात राहतात. म्हणून आयुष्यभर केवळ धन संपत्तीच्या मागे न धावता , चांगल्या कर्माची शिदोरी जमवा. कारण शेवटच्या प्रवासात सोबत येतात ती आपल्या कृतीची पुण्याई आणि लोकांच्या मनात जपलेल्या आठवणी. हेच खरे आयुष्याचे सर्वात मोठे यश आणि अमूल्य धन आहे.असे त्यांचे विचार आहेत. काळूराम लांडगे यांनाआतापर्यंत १०० पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त आहेत.तसेच पै.काळुराम लांडगे यांना महाराष्ट्र राज्याच्या गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण व त्यांची सर्व टीम तसेच गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी त्यांच्या संपूर्ण टीमचे मार्गदर्शन लाभत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page