लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांबाबत लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन



मावळ मराठा न्यूज़ :- आज लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री पंडित पाटील यांना आज शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मावळ तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, समन्वयक जयवंत दळवी जेडी, उपशहरप्रमुख संजय भोईर, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, धीरज घारे यांच्या वतीने आज देण्यात आले.लोणावळा शहरातील मे अखेरीस बाजारपेठ,भांगरवाडी, सिध्दार्थ नगर, रायवुड खोंडगेवाडी व शहरातील इतर ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते पहिल्याच पावसात डांबरीकरण झालेले रस्ते वाहून गेले व रस्त्यावर खड्डे पडले आहेत तसेच सिध्देश्वर मंदिर परिसरातील व ऑक्झिलियम काॅनवेंट हायस्कूल समोरील, ट्रायोज माॅल समोरील गटराचे काम अर्धवट असल्याने स्थानिक नागरिक व लोणावळ्यात येणारे पर्यटकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे सदरील रस्त्यावर अशा निकृष्ट दर्जांच्या कामामुळे अपघात झाल्यास या अपघातास सदरील ठेकेदार व लोणावळा नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील याची नोंद नगरपरिषद प्रशासनाने लवकरात घेऊन संबंधित काम मार्गी लावावे असे लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना विनंती करण्यात आली.




