राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर यांच्या वतीने १२ डिसेंबर ला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

मावळ मराठा न्युज लोणावळा :-लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने दिनांक १२/१२/२०२३ रोजी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत लोणावळा नगरपरिषद पार्किंग येथे श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, हितचिंतक यांनी सकाळी नऊ वाजता हजर राहावे,सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त केक कापून सदर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात येणार आहें. असे आवाहन राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे विनोद होगले यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना केले आहे यासाठी श्री शिवशंभु चरिटेबल ट्रस्ट कमिटी,महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page