महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा



मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, शिवसेना उपनेते, समन्वयक मा.आ.रविंद्र मिर्लेकर व शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार श्री सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना मावळ तालुका संपर्क प्रमुख श्री प्रभाकर पवार यांच्या सहकार्याने, शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुसगाव, वरसोली जिल्हा परिषद गट विभाग व मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली देवले येथील अनाथाश्रम येथे अन्नदान करण्यात आले.या कार्यक्रमास शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, मावळ तालुका सल्लागार मारूती खोले, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, तालुका समन्वयक काळु हुलावळे, वरसोली गण विभाग प्रमुख कैलास पडवळ, कुसगाव गण विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, मा शाखाप्रमुख प्रकाश चव्हाण, मा शाखाप्रमुख किशोर कालेकर, शाखाप्रमुख शंकर वाजे, युवासेना शाखा अधिकारी कमलेश गाढवे, युवासेना अधिकारी साहिल बोके, संदिप आंबेकर, संतोष गिरी, तेजस केदारी, मिलींद बोरकर व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




