महाशिवरात्र म्हणजे आई माले बी जत्रेला जायचं जावू देना वं …


मावळ मराठा न्यूज:- १८ -२-२०२३,शनिवार, महाशिवरात्री निमित्त संपूर्ण देशात विविध धार्मिक विधी ,धार्मिक पूजाअर्चा,प्रवचने,कीर्तन,अभिषेक आदी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आणि बहुतांश ठिकाणी ग्रामीण तसेच शहरी भागात उत्सव,जत्रा ,यात्रा,उरूस या भरवल्या जातात.ही अनेक वर्षांची परंपरा आहे. या उत्सव,जत्रा ,यात्रा,उरूस यात लहान मुलांसाठी खेळ,खाण्याचे विविध पदार्थ,वाद्ये,खेळणी,कपडे,गृहपयोगी वस्तू, डोंबारीचा खेळ,हातावर गोंधणे,पाळणे सौंदर्य प्रसाधने,कुस्त्या, गाठी शेव अश्या विविध उपयोगी वस्तू सर्वच बाळ,तरुण, स्री, पुरुष,महिलांना, वृध्दांना एकाच ठिकाणी मिळत असल्यानं अश्या उत्सव, जत्रा, यात्रा, उरूस यांना फार पूर्वी पासून अनन्य साधारण महत्व आहे.त्यामुळे अश्या यात्रेला सर्व धर्माचे लोक एकत्र येतात त्यामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणावर होत असते.अश्याच आपल्या रायवूड मधील सिद्धेश्वर महादेव मंदिर यात्रा देखील त्याला अपवाद नाही. फक्त आताच्या यात्रेला आधुनिकतेची जोड असते.बाकी सर्व जुन्या रुढी परंपरा प्रमाणेच सर्व यात्रा होते.पूर्वी बैलगाडी घेवून संपूर्ण कुटुंब यात्रेला येत होते त्या बैलगाडी ची जागा आता चारचाकी,दुचाकी वाहनानी घेतली इतकेच. रायवूड मधील यात्रेत आजू बाजूच्या ग्रामीण भागातून आणि बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना लोणावळा लायन्स क्लब सुप्रिमोज़,श्री सत्यनारायण मंदिर ट्रस्ट मावळ वार्ता फाउंडेशन आदी सेवाभावी संस्थांनी साबुदाण्याची खिचडी,साबुदाणे वडे, केळी तर मुस्लिम समाज यांचे वतीने सरबत अश्या प्रकारचे वाटप करून भाविकांचे स्वागत केले. शिव पार्वतीचा विवाह यादिवशी झाल्याने महाशिवरात्र मोठ्या उत्साहात भाविकांनी शिव मंदिरात गर्दी झालेली पाहायला मिळाली.त्यामुळे एकंदरीत महाशिवरात्र म्हणजे लहान मुलांसाठी खाऊ,खेळणी,मनोरंजन,खेळ असल्याने एक पर्वणीच असते,त्यामुळे ते पालकांच्या मागे लागून यात्रेत नेण्यासाठी आग्रह करतात आणि म्हणतात,आई माले बी जत्रेला जायचं जावू देना वं …..




