*रक्षाबंधन दिनानिमित्त अमितजी मोहिते पाटील आणि सरस्वती सोशल फाउंडेशन प्रो.प्रतीक्षा सोनवणे तर्फे “एक राखी सैनिकांसाठी*

एक राखी सैनिकांसाठी  आज रक्षाबंधन दिनानिमित्त  आयोजक अमितजी मोहिते पाटील आणि सरस्वती सोशल फाउंडेशन  प्रो.प्रतीक्षा सोनवणे मॅडम   तर्फे “एक राखी सैनिकांसाठी” सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक वीर जवानासाठी ही राखी म्हणजे केवळ धागा नाही, तर देशवासीयांच्या प्रेमाची,विश्वासाची आणि कृतज्ञतेची निशाणी आहे.  आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी बॉम्बे  इंजिनिअरिंग ग्रुप  किरकी येथे  रक्षाबंधनचा साजरा करण्याचा योग आला. आज  1250 सैनिकांना राखी बांधण्याचा सरस्वती क्लासेस कुरुळी यांना मान मिळाला. आज ज्यांच्यामुळे हा योग आला ते अमितजी मोहिते पा. यांनी कर्नल तिवारी साहेब तसेच ऑडनरी लेफ्टनंट बीसी शिंदे साहेब यांच्या शी बोलणे करुन आम्हाला बोलवून मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आज कर्नल तिवारी साहेबांनी आमच्या सरस्वती सोशल फाउंडेशन ला खूप खूप शुभेच्छा दिल्या. आज च्या कार्यक्रमांमध्ये कॅप्टन अनिल ठुबे,लेफ्टनंट गोरखनाथ कटारे, कॅप्टन आप्पासाहेब यादव, कॅप्टन शिवाजी गरुड साहेब,हवालदार देवकर, संदीप देसाई आधी अधिकारी व जवान उपस्थित होते म्हणून तर म्हणते तुम्ही देशाच्या रक्षणासाठी घरापासून दूर राहता, म्हणून आम्ही निर्धास्तपणे आपल्या घरात सण साजरा करू शकतो.तुमच्या शौर्याला, त्यागाला आणि देशसेवेला मनापासून सलाम! 🙏एक राखी तुमच्यासाठी,एक वचन देशासाठी…तुम्ही सीमेवर सुरक्षित रहा,हीच प्रत्येक बहिणीची मनापासून प्रार्थना.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page