सिंगापूर येथे झालेल्या २४ व्या इशियन स्पर्धेत बुद्धिबळ खेळात अधवान ओसवाल ची दमदार कामगिरी ; ‘कंडिशनल सीएम”किताब आणि ५ पदकांची कमाई

मावळ मराठा न्युज – प्रतिनिधी,ऑगस्ट महिन्यात सिंगापूर येथे झालेल्या २४ व्या इशियन स्पर्धेत बुद्धिबळ खेळात अधवान ओसवाल या चिमुकल्याने दमदार कामगिरी केली आहे.’कंडिशनल सीएम”किताब आणि ५ पदकांची कमाई अद्वान ओसवालसाठी ‘कंडिशनल सीएम’ (Conditional CM) किताब आणि ५ पदके २४ व्या ‘आसियान+’ (ASEAN+) वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत (२०२६) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना,महाराष्ट्रातील मुंबई येथील अधवान ओसवालने अभिमानास्पद कामगिरी केली. त्याने ‘कंडिशनल सीएम’ किताब आणि पाच पदके जिंकली. ‘अंडर-८ ओपन’ – वैयक्तिक कांस्य | ३ रे स्थान, ७/९ गुण, ‘अंडर-८ ब्लिट्झ’ – वैयक्तिक कांस्य ४ थे स्थान, ६.५/९ गुण,’अंडर-८ ओपन’ – सांघिक रौप्य’, अंडर-८ ब्लिट्झ’ – सांघिक रौप्य, ‘अंडर-८ रॅपिड’ – सांघिक कांस्य अशी नेत्रदीपक आणि अभिमानास्पद कामगिरी करून डॉ.मिहीर आणि डॉ. सुनेहा ओसवाल (अभिमानास्पद पालक व विशेष मार्गदर्शक),आजोबा डॉ.पोपट ओसवाल व आजी कांता ओसवाल,काका डॉ. संजम व डॉ. भावंशी ओसवाल, बहीण यानवी यांच्याकडून त्याचा या घवघवीत यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा. तसेच संपूर्ण ओसवाल परिवार आणि मित्रपरिवाराचा आशीर्वाद हा सैदव असेल आणि पुढील स्पर्धेसाठी आणि भारताचे नाव उंचावण्यासाठी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page