जलदिंडी फौंडेशन व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी येथे राज्यस्तरीय लोकनृत्य,समूहगीत व नाटय स्पर्धांचे आयोजन

मावळ मराठा न्यूज़, आकुर्डी:- जलदिंडी फौंडेशन व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज आकुर्डी येथे राज्यस्तरीय लोकनृत्य, समूहगीत व नाटय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडी(बौर)या शाळेने लोकनृत्य (ग्रामीण)स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला,सदर नृत्य हे पर्यावरणावर आधारित असल्याने प्रेक्षकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळालाया नृत्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी शेखरे, शिक्षिका श्रीम.सरोदे मॅडम व रोळे मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले तसेच त्यांना एस.एन.एस.फाउंडेशनच्या कु.भालशिंगे मॅडम व सौ. शारदा भालेकर मॅडम यांचे सहकार्य लाभले.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ व पालक यांनी मोलाची साथ दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page