निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बी आर टी बसस्थानकाचा नामफलक दुरूस्तीबाबत सकल मातंग समाजाने दिला इशारा

मावळ मराठा न्युज:- पिंपरी – प्रतिनिधी,निगडी,दिनांक ८ -३ -२०२४ च्या स्मरण पत्रा बाबत निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे बी आर टी बसस्थानकाचा नामफलक दुरूस्ती करण्याबाबत सकल मातंग समाजाने पत्रातुन इशारा दिला आहे.निगडी येथील बी आर टी मुख्य बसस्थानकाचा नामफलक फाटलेला आहे. तरी तो आपण तात्काळ दुरूस्ती करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला द्यावेत अशी फोनवरून मुख्य अभियंता प्रमोद आंबासे यांच्याकडे मागणी केली. व दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला यावेळी सकल मातंग समाज समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, प्रदेश समन्वयक युवराज दाखले, आबासाहेब मांढरे, रामदास कांबळे, राजु चव्हाण, मिराताई अल्लाट, रेखाताई दुनगव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page