मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून दहा लाख रुपये मंजूर, स्मशानभूमि निवारा शेड कामाचे भूमिपूजन संपन्न


मावळ मराठा न्यूज़ :- डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमि निवारा शेड चा विषय अनेक वर्षे प्रलंबित होता,डोंगरगाव चे लोकनियुक्त सरपंच सुनील येवले यांनी या कामाचा मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून हे काम लवकरात लवकर व्ह्यावे व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठि नियमित पाठपुरावा केला अखेर त्याला यश आले.त्या कामाचे भूमिपूजन नुकतेच डोंगरगाव चे सरपंच सुनील येवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलिस पाटिल राजश्री कचरे ,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोलप,राजेंद्र दलवी,उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे ,सुभाष खाले,माजी उपसरपंच संजय जायगुडे,माजी ग्रामपंचायत सदस्य कांताराम दलवी,युवासेना विभाग प्रमुख अक्षय साबले,शंकर लोहर, दत्तात्रय येवले ,विशाल वाघमारे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




