मनशक्ती केंद्राची टीम पोहचली ७ किमी पायपीट करत आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा देण्यासाठी




मावळ मराठा न्यूज :- मनशक्ती केंद्र,लोणावळाची टीम ६,७ किमी. पायपीट करत पोहचली जेथे साधा रस्ता देखील नाही अश्या दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यासाठी,देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतो पण आजही काही भागात आदिवासी बंधू भगिनींना दररोज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ७,८ किमी पायपीट करावी लागते .तिकडे ना रस्ते, ना पाणी, आणि ना वीज. “मनशक्ती” केंद्रामार्फत विनामूल्य आरोग्य शिबिर, कळकराई येथे,माळेगाव खुर्द जवळ,तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील डोंगर कपारीत असलेला अतिशय दुर्गम भाग सुमारे ६ किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायी जावून सदर कैम्प घेण्यात आला. पूर्ण अदिवासी वस्तीचे हे गाव. दि. ११-२-२०२३ ,शनिवारी पार पडले . सुमारे ८०- ८५ गरीब आदिवासी व इतर बंधू भगिनी,मुले-मुली रुग्ण असलेल्या ग्रामीण वस्तीवर पार पडला. तेथील वस्तीवर प्राथमिक उपचार म्हणून गावासाठी औषधे देण्यात आली. मनशक्तिचे डॉ सुहास गोसावी, खंडेलवाल मेडिकल चे राजू खंडेलवाल हिमांशु भावे, शांति परब,शोभा पाटेकर अनिल पिंपलकर आणि सोनाली शेळके आदी जणांनी या कार्यात आपला सहभाग नोंदवला.




