लोणावळ्यात भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नंदकुमार वाळंज उर्फ बाबुजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन



मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला, श्री म्हसोबा उत्सव मंडळ तसेच श्रीमंत वाद्यपथक लोणावळा व लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेड्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर भांरवाडीतील संत ज्ञानेश्वर विद्यालय पार उत्साहित पार पडले .या भव्य रक्तदान शिबिरात युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला . शिबिरामध्ये श्रीमंत वाद्यपथकाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यामध्ये संकेत शेडगे, अक्षय बांदल, ओंकार शिंगरे ,अक्षय जाधव ,मनोज पाटील, रितिक हरिश्चंद्रे, रोहन तोंडे,तुषार म्हसकर, विशाल जाधव, किरण दिघे, निखिल घाणेकर ,अक्षय घाणेकर, प्रसाद चतंत्रा,योगेश शिंगरे, प्रतीक सपकाळ, ओमकार काळे, कु. वैष्णवी मराठे आघाडीवर होते. शिबिरामध्ये लायन्स ऑफ लोणावळा लेजेड्स क्लबचे अध्यक्ष सुरेश गायकवाड ,मीनाक्षी गायकवाड, दरेकर सर राजेश मेहता,उमा मेहता अमित अग्रवाल , कीर्ती अग्रवाल , रसाळ सर, हेमंत अग्रवाल, हेमंत पाटेकर, तसेच या ऍक्टिव्हिटीचे प्रमुख माजी नगरसेवक मनोज लऊळकर व अनेक मान्यवर ,उपस्थित होते.या शिबिरामध्ये प्रत्येक रक्तदात्यास एक स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.




