संपर्क बालग्राम,भांबर्डे येथील अनाथ आश्रमातील विध्यार्थानी घेतला लाईव्ह स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्याचा मनोसक्त आनंद



मावळ मराठा न्युज :-मावळ,मारवाड कप ह्या नावाने क्रिकेट सामन्याचे आयोजन पुणे येथील शिंदे कॉलेज पुणे येथील भव्य ग्राउंड येथे क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन केले होते. त्याचे औचित्य साधत संपर्क बालग्राम भांबर्डे येथील अनाथ ५० विध्यार्थाना लाईव्ह मॅच स्टेडियम मध्ये पाहण्या करीता बस द्वारे नेण्यात आले. त्यावेळेस सर्व विध्यार्थाना टोपी, बॅग, गिफ्ट्सची व भोजनाची व्यवस्था केली होती. सदर विध्यार्थानी पहिल्यांदाच गावाकडून येऊन मॅच पाहत असल्याने खूप आनंद व्यक्त केला. लायन्स क्लब लोणावळा, खंडाळाचे सेक्रेटरी विरल गाला ला. देवेंद नालेकर तसेच संस्थाचे शिक्षक मुलांना घेऊन मुलं बरोबर आले. यावेळी माजी प्रांतपाल राजकुमार राठोड ह्यांनी स्वागत केले व लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे सेक्रेटरी ह्यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले अशी माहिती लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष अँड प्रफ्फुल बी. लुंकड ह्यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना दिली.




