स्वामी विवेकानंद पुरस्काराचे वितरण,युवा पुरस्कार अशोक देशमाने,भक्त पुंडलिक पुरस्कार सुधीर धर्माधिकारी,जीवनगौरव,डॉ मिलिंद एकबोटे यांना जाहीर

मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) शरद नगर चिखली येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार अशोक देशमाने यांना, सुधीर धर्माधिकारी यांना भक्त पुंडलिक पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यांना डॉ मिलिंद एकबोटे यांना जाहीर झाले आहे. प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी दि १२ जानेवारी २०२४ सायंकाळी ७ वा स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान शरद नगर स्पाईन रोड सेक्टर-१९ चिखली या ठिकाणी होईल.यावेळी आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक एकनाथ पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कशीद, उपनिबंधक नितीन काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या गेली अनेक वर्षापासून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विवेकानंदांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याची माहिती स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संतोष ठाकूर यांनी दिली.कार्यक्रम आयोजनासाठी सुनील पंडित, मिलिंद वेल्हाळ, महेश मांडवकर, संतोष ठाकुर, शंकरराव बनकर, पंढरीनाथ म्हस्के, सुनील खंडाळकर, देवराम मेदनकर, दिलीप मांडवकर,अशोक हड़के यांनी पुढाकार घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page