भाजे येथे गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पणाने दुमदूमला घोषणानी दुमदूमला परिसर

परिसर भाजे- : मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या पायथ्याशी वसलेल्या भाजे गावामध्ये लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १६ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आलेपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक उंची असलेला हा एकमेव पुतळा असून मागील दोन वर्षापासून सदरचा पुतळा बसवण्यासाठी चौथरा बनवण्याचे काम व सोबतच पुतळा बनविण्याचे काम देखील सुरू होते. साधारण १८ फूट उंचीचा चौथरा येथे बनवण्यात आला असून त्यावर महाराजांचा १६ फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आला आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प गावातील तरुणांनी केला अवघ्या सहा महिन्यांमध्ये पुतळा उभारण्याकरिता लागणाऱ्या सर्व शासकीय परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात करतलोक सहभागातून हे काम करण्यात आले असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्याचे अनावरण व लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे सर्वांच्या मदतीने व सहकार्याने अतिशय सुंदर अशा पद्धतीने भाजे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याला चारही दिशेने राजमुद्रा बसवण्यात आली आहे. पुतळ्याच्या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले होते.गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता पारंपारिक वेशभूषेत व पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये मळवली ते भाजे भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये ढोल लेझीम पथक ,ऊंट ,घोडे,डीजे, विद्युत रोषणाई सह शिवकालीन मर्दानी खेळांचा सहभाग होता पारंपरिक रथ व बैलगाड्यांसह पारंपारिक वेशभूषेत ग्रामस्थांबरोबर परिसरामधील नागरिकही या सोहळ्यात सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.यात महिला व लहान मुलांचा सहभाग मोठ्याप्रमाणात होता गावातील वातावरण शिवमय झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता या अनावरण सोहळ्यास तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.नंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम व महाराजांचे पोवाडे या ठिकाणी सादर केले जाणार असून तदनंतर सर्वासाठी महा भंडारा आयोजित करण्यात येणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page