अभिमन्यु भट्टाचार्य मेमोरियल ट्रस्ट,दिल्ली यांच्या कडून लोणावळाच्या शिवदुर्ग मित्र ला ट्रॅक्स क्रुझर ॲम्ब्युलन्स भेट


मावळ मराठा न्यूज़, प्रतिनिधि , लोणावला, अभिमन्यु भट्टाचार्य मेमोरियल ट्रस्ट (ABMT)दिल्ली यांच्या कडून शिवदुर्ग मित्र, लोणावळाला ट्रॅक्स क्रुझर ॲम्ब्युलन्स भेट देण्यात आली. संस्थेच्या प्रमुख अनुराधा भटाचार्य व त्यांचे काही सहकारी लोणावळ्याला येऊन भेट देऊन शिवदुर्गची माहिती घेतली होती व त्यानंतर शिवदुर्गच्या कामाचे कौतुक करीत अधिक चांगले काम करण्यासाठी जंगलात डोंगराळ भागात मदतकार्य पोचवण्यासाठी या ॲम्ब्युलन्सची निवड केली. ABMT चे पुण्यातील ट्रस्टी कर्नल कौस्तुभजी शशिकांतजी पित्रे पुणे यांनी ॲम्ब्युलन्स शिवदुर्गला सुपुर्द केली . अभिमन्यु भट्टाचार्य मेमोरियल ट्रस्ट, दिल्ली . आमच्यावर जो विश्वास दाखवला तो पुर्ण करु असा विश्वास दिला




