मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून २३ लाख ६७ हजार किमतीची गुरव वस्तीसाठी विकास कामे मंजूर




मावळ मराठा न्युज,कुसगाव :- मावळ चे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या आमदार निधीमधून कुसगाव ग्रामपंचायत सदस्य असलेले प्रदीप कोकरे, नितीन मोरे,संगीता गायकवाड यांच्या प्रयत्नातून वार्ड क्रमांक एक मध्ये आरसीसी गटर व रस्त्याचे काम एकूण किंमत रु.२३,६७,२८९/- मंजूर केले असून ग्रामस्थांच्या सेवेसाठी रस्ता आणि गटारी चे काम लवकरच पूर्ण होणार आहे. मोजें कुसगांव येथे वॉर्ड क्र. १ अंतर्गत गुरववस्ती येथील सुनील फाटक ते पांगारे घर (R.C.C.) रस्ता व बंदिस्त गटारे करणे साठी निधी उपलब्ध झाला आहे.तसें पत्र देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला देण्यात आले आहे सहा महिन्याचा आत ही कामे होणार आहेत.त्याबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके यांचे प्रदीप कोकरे,नितीन मोरे आणि संगीता गायकवाड यांनी वॉर्ड क्रमांक एक च्या ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि आभार व्यक्त केले आहे.




