आधार फाऊंडेशनच्या वतीने प्रफुलशेठ खंडेलवाल यांच्या वाढदिवसा निमित्त गरजूना शैक्षणिक,सामाजिक मदत


मावळ मराठा न्युज :-लोणावळा, प्रफुलशेठ खंडेलवाल यांच्या वाढदिवसा निमित्त भांगरवाडीतील विद्यार्थिनीला शैक्षणिक फी आणि औंढे येथील गरजु कुटुंबास मदत करण्यात आली .तसेच वाढदिवसानिमित्त श्री प्रफुलशेठ खंडेलवाल यांच्यावतीने औंढे येथील गरजु कुटुंबास मदत करण्यात आली . औंढे ग्रामस्थांच्या वतीने आधार फाऊंडेशन व श्री प्रफुलशेठ खंडेलवाल यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे , श्री पांडुरंग तिखे, श्री प्रफुलशेठ खंडेलवाल , श्री शशिकांत खंडेलवाल , श्री गणेश जाधव, श्री चेतन पंड्या, श्री भगवान घनवट , श्री राजेंद्र भालेराव , श्री बापु कुलकर्णी , श्री विष्णू घनवट,श्री हनुमंत साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.




