रोज लढतो न्यायदानासाठी आजचा दिवस रक्तदानासाठी” लायन्स क्लब ऑफ तळेगाव,वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

मावळ मराठा न्यूज़:- वडगाव, “रोज लढतो न्यायदानासाठी आजचा दिवस रक्तदानासाठी” हे घोषवाक्य घेऊन लायन्स क्लब ऑफ तळेगाव आणि वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर नुकते च, वडगाव येथे न्यायालयाच्या दालनात पार पडले. यावेळी माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस एस पल्लोड सो व लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिकेत काळोखे, वडगाव मावळ लीगल असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.दीपक चौधरी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी लायन अध्यक्ष अनिकेत काळोखे यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे सांगताना रक्तचा तुटवड्यामुळे दररोज १८ हजार लोकांचा मृत्यू होतो असे सांगितले व एक रक्ताची बाटली तीन जणांचा जीव वाचवते असे सांगितले .त्यावेळी मा.सहन्यायाधीश सी आर उम्रडेकर सो ,आर एन चव्हाण सो, गांधी सो ,एस आर बर्गे सो ,अगरवाल सो, अँडव्होकेट एन एस दाभाडे , शिवराम मोरे, अशोक ढमाले,संतोष गुंजाळ,मुनफ शेख आणि वडगाव मावळ असोसिएशन चे उपाध्यक्ष अडवोकेट सोमनाथ पवळे, एडवोकेट मोनाली ढोरे, सचिव एडवोकेट राम शहाणे, सचिव एडवोकेट मोनाली कुलकर्णी व खजिनदार एडवोकेट प्रिया पंडित सर्व वकील,पक्षकार व कर्मचारीआणि लायन्स क्लबचे पदाधिकारी लायन सुचित्रा चौधरी, लायन शेखर चौधरी, लायन प्रकाश पटेल ,लायन नंदकुमार काळोखे ,लायन अनिता बाळसराफ, लायन प्रमिला वाळुंज ,लायन प्रियंका काळोखे ,लायन मयूर राजगुरूव, लायन सुरेश जाधव व लायन राजेंद्र झोरे उपस्थित होते.पन्नास पेक्षा जास्त व्यक्तीनी रक्तदान केले ज्यामध्ये लायन्स ऍडव्होकेट व कोर्टाचे कर्मचारी व पक्षकार यांनी सहभाग नोंदवला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page