लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांच्यावतीने ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूल येथे पीस पोस्टर उपक्रम

मावळ मराठा न्युज – लोणावळा,विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना चालना देण्याच्या उद्देशाने दिनांक २०/०९/२०२५ रोजी लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूल येथे “Brushes of Peace, Colors of Hope” या घोषवाक्याखाली पीस पोस्टर ऍक्टिव्हिटी घेण्यात आली.या उपक्रमासाठी क्लबच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल, सचिव लायन निराली नालेकर, खजिनदार अश्विनी कदम, डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पोपट ओसवाल तसेच ऍक्टिव्हिटी चेअरमन देवेंद्र नालेकर आणि अ‍ॅड. राजू शिंदे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्ष लायन कांता ओसवाल यांनी चित्रकला स्पर्धेसाठी पहिल्या तीन विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षक वृंदगन यांचा मोलाचे योगदान प्रॉप्त झाले या उपक्रमात सुमारे १५० विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला व त्यांच्या सर्जनशीलतेला व शांततेच्या संदेशाला उत्तम दिशा मिळाली. व विद्यार्थिनींनी केलेल्या रंगीबेरंगी सादरीकरणामुळे वातावरण आनंदमय झाले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page