खानदेश विकास मंच आयोजित गणेश उत्सवाला आमदार सुनील आण्णा शेळके यांची सदिच्छा भेट

मावळ मराठा न्यूज़:- तळेगाव , पूज्य साने गुरुजी, बालकवी ठोंबरे ,कवियत्री बहिणाबाई अशा प्रतिभा संपन्न विभूतींचा असलेला खानदेश.भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदाच्या मानकरी प्रतिभाताई पाटील ज्या भागातून आल्या तो खानदेश.अशा खानदेशातून तळेगाव आणि परिसरात उदरनिर्वाहासाठी जवळजवळ एक हजार परिवार एकत्र आलेत. त्यानी केवळ चार महिन्यात व्हाट्सअपग्रुपच्या माध्यमातून ते एकमेकांशी घट्ट जोडले गेलेत, सुखकर्ता दुखहर्ता विघ्नहर्ता गणरायाचा प्रथमच गणेशोत्सव माळवाडी परिसरात या खानदेश विकास मंचने साकार केला, पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात वैद्यकीय व्यवसाय करणारे मूळचे खांदेशचे असलेले डॉक्टर शाळीग्राम भंडारी, डॉक्टर किरण देशमुख, प्रसिद्ध औषध विक्रेते सुनील जैन अशा विविध क्षेत्रातील- मूळचे खानदेशी असलेले मान्यवरही या खानदेश विकास मंचचे सक्रिय सभासद झालेत! शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या सभेला संबोधित करताना डॉ. शाळीग्राम भंडारींनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक केले . या एकदिलानं कार्यरत असणाऱ्या युवाशक्तीला रक्तदान शिबिर- सर्व रोगनिदान शिबिर- त्याबरोबरच विविध औद्योगिक कंपनीच्या सहकार्यातून रोजगार उपलब्ध करून देणारी विविध शिबिर आयोजित करण्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सहकार महर्षी जेष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी सर्वप्रथम खानदेश विकास मंचच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक केलं. याबरोबरच या विकास मंचास दहा गुंठे जागा आपण निश्चित उपलब्ध करून देऊ असे जाहीर केले.त्यानंतर विद्यमान कर्तुत्व संपन्न आमदार सुनील आण्णा शेळके यांनी हा भव्य स्नेहभोजन मेळावा आणि गणेशोत्सव या खानदेश विकास मंचने अतिशय देखण्या प्रमाणात संपन्न केला त्याबद्दल मंचच्या सर्व कार्यकर्त्यांच मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं. त्याबरोबरच सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी जाहीर केलेल्या जागेवर सभागृह बांधण्यास आपली पहिली पंचवीस लाखाची देणगी असेल असे सांगून पुढील गणेशोत्सवात आपण खानदेश विकास मंचच्या सभागृहात गणपती दर्शनाला येऊ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे विकास मंचच्या सभासदांनी या निर्णयाचे प्रचंड टाळ्यांच्या गजरातून स्वागत केले. आमदार सुनील आण्णा शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन संभाजी शिंदे, इंदुरी ग्रामपंचायतचे सरपंच- उपसरपंच तसेच जेष्ठ लेखक, वक्ते डॉ. शालिग्राम भंडारी, प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी, सामाजिक कार्यकर्ते ला. राधेश्याम भंडारी या सर्वांचा शाल श्रीफळ देऊन अध्यक्ष उमेश पाटील,पंकज पाटील संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि मनोहर पगारे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला! ह्या छोटेखानी कौटुंबिक सोहळ्याच सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त करताना श्री मनोहर पगारे यांनी स्वर्गीय डॉ. दिलीप भोगे यांचा या खानदेश वासियांना एकत्र आणण्यात सिंहाचा वाटा आहे असा त्यांचा आवर्जून उल्लेख केला. या अतिशय शिस्त बद्ध अशा स्नेहभोजनाचा लाभ जवळजवळ साडेतीन ते चार हजार खानदेश वाशीयांनी घेतला.माळवाडी येथील माऊली कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद समाधान तृप्तता दिसत होती. खानदेश विकास मंचच्या गणेशोत्सवाचा हा संपूर्ण समारंभ सर्वर्थाने यशस्वीपणे पार पडण्यास निशांत गांगुर्डे,योगेश चौधरी,विठोबा महाजन ,रिरेश शिरसाठ ,सुजित बर्वे,जीवन आगळे ,ललित महाजन,जितेंद्र पवार,कैलास महाजन ,लोकेश भंगाळे,हेमंत बाविस्कर ,नाना देसले,कुणाल पाटील,भाईदास पाटील,विकास पाटील,अजय पाटील या कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग होता.आधारस्तंभ डॉ. शालिग्राम भंडारी, डॉ किरण देशमुख ,श्री सुनील जैन श्रीसुशील सैंदाणे ,श्री सुभेदार शिवाजी पाटील, श्रीमानरवींद्र बापू पाटील, श्रीमान मोतीलाल बापू पाटील श्रीमान ज्ञानेश्वर पाटील,सांगवी श्रीमान भरत देसले.यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page