*लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप व गुरुजनांचा सन्मान*









मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात शुक्रवार (दि.२९ जुलै) रोजी रिच ट्रस्ट हडपसर, पुणे व सिल्व्हरी डॉन ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय, लोणावळा व नगरपरिषद शाळा क्रमांक दोन व शाळा क्रमांक पाच येथील विद्यार्थ्याना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. लोणावळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असते व आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी छत्री व रेनकोट सारख्या आवश्यक गोष्टी खरेदी करू शकत नाही व सतत भिजल्यामुळे आजारी पडतात. व गैरहजर राहतात हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्व गुरुजनांचा सन्मान सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका दरेकर मॅडम, शीतल अहिरे मॅडम, शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमास रिच ट्रस्टचे डॉक्टर श्री.लोचनसाहेब, श्री.जितेंद्र मोहन व सिल्व्हरी डॉन ट्रस्ट यांच्यावतीने निरंजनसाहेब इत्यादी उपस्थित होते. . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमजद पठाण सर यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण बलकवडे सर यांनी केले.आभारप्रदर्शन श्री . पठाण सर यांनी केले.



