कामशेतमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या पदयात्रेत गर्दीचा उच्चांक

मावळ मराठा न्युज :-कामशेत,मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या कामशेत, वडगाव येथील पदयात्रेला नागरिकांनी गर्दीचा उच्चांक केला. त्यामुळे ही गर्दीच सांगून जाते, की बापूसाहेब भेगडे हे फिक्स आमदार आहेत. बापूसाहेब भेगडे यांनी काढलेल्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. वेगवेगळी प्रचारगीते, रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी, त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आणि एकच नारा “बापूसाहेब भेगडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या पदयात्रेला महिला, तरुणाई, ज्येष्ठाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बापूसाहेब भेगडे यांच्या विजयासाठी ‘वज्रमूठ’ बांधली असून, विजयाचा निर्धार केला. कामशेतमध्ये व्यापाऱ्यांनी केलेल्या स्वागताने बापूसाहेब भेगडे भारावले कामशेतमध्ये बुधवारी सायंकाळी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. कामशेत शहरातून काढलेल्या या पदयात्रेला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत भेगडे यांचे जागोजागी स्वागत केले. महिलांनी औक्षण करीत विजयी तिलक लावला. तसेच सर्व व्यापारी बांधव पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत कामशेतमधून मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास दिला. वडगावमध्ये जल्लोषात स्वागत : वडगावमध्ये काढलेल्या पदयात्रेला फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा निनाद आणि प्रचारगीतांवर तरुणांनी ठेका धरत ‘बापूसाहेब भेगडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’चा नारा दिला. जेष्ठ महिला, युवतींनी विजय तिलक लावत औक्षण केले. या पदयात्रेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘भावी आमदार’ असा नारा देत बापूसाहेब भेगडेच आमदारकीचे दावेदार असा निर्धार केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page