श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ लोणावळा या ठिकाणी परमपूज्य सिद्धी सुधाजी महाराज साब आदी ठाणा तीन च्या सानिध्यात त्रिवेणी संगमात चातुर्मासाची सुरुवात

मावळ मराठा न्युज – लोणावळा,श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ लोणावळा या ठिकाणी परमपूज्य सिद्धी सुधाजी महाराज साब आदी ठाणा तीन च्या सानिध्यात त्रिवेणी संगमात चातुर्मासाची सुरुवात भक्तामर अनुष्ठान, गुरुपौर्णिमा आणि चातुर्मास प्रारंभ अशा त्रिवेणी संगमात संपूर्ण जैन समाज महाराजांच्या वाणीत न्हाऊन निघाला.आपल्या व्याख्यान मध्ये परमपूज्य महाराज साब नी गुरूंचे जीवनातील स्थान आणि गुरूंचे महत्त्व समजावून सांगितले. येणाऱ्या चातुर्मास मध्ये प्रत्येकाने जप तप करत आपल्या जन्माचे सार्थक करायचे आहे अशी शिकवण दिली. मंगल पाठ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संघाचे अध्यक्ष माननीय श्री गिरीषजी पारख यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत करून तन-मन धनाने सर्वांनी हा चातुर्मास ऐतिहासिक करण्यात हातभार लावावा असे आव्हान केले. श्रीमती कांताबाई नहार यांच्यातर्फे गौतम प्रसादीची सोय करण्यात आली. मोठ्या भक्ती भावाने सर्व भक्त यांनी या त्रिवेणी संगमाचा लाभ घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page