गुरुपौर्णिमा निमित सूर साधना गायन क्लासेसचा स्नेह मेळावा व भक्ति गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,सूर साधना गायन क्लासेस चे संचालक प्रदीप वाडेकर यांनी गुरुपौर्णिमेला विरंगुळा केंद्र लोणावळा येथे गायन क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व भक्ति गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता सूर साधना क्लासेस लोणावळा व खंडाळा येथे सुरू असून ४५ विद्यार्थी सुगम संगीताचे शिक्षण घेत आहेत.गुरू पौर्णिमेस गुरुवर्य प्रदीप वाडेकर यांचा यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी औक्षण करून सन्मान केला.यावेळी विठू माउलि या भक्ति गीतांच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांनी उपस्थीत पाहुण्यांचे स्वागत केले.ज्येष्ट नागरिक विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर केले तर संचालक प्रदीप वाडेकर,मंगल राणे सुलभा जगताप राजू जगताप, सुनील कडू, संध्या होजगे , दीपाली कांबळे , अश्विनी कडूसकर रमा सिनकर यांनी श्रवणीय भक्तिगीते सादर केली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे , रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष उदय पाटील,जयवंत नलोदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सिरसकर यांनी केले कार्यक्रमासाठी सुनील पानगवकर , पांडुरंग तिखे गोरख चौधरी यांनी विशेष योगदान दिले.




