किरीट सोमय्या यांचेसोबत फोटो काढून नितीन अग्रवाल यांची बदनामी करणारी पोस्ट प्रकाश पोरवाल यांना भोवणार?

प्रकाश पोरवाल यांनी नुकत्याच वायरल केलेली नितिन अग्रवाल यांचे बाबतची एक बदनामी कारक पोस्ट पोरवाल यांना चांगलीच भोवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रीय ख्यातीप्राप्त भाजपा चे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांच्या सोबत कुठेतरी गर्दीत घाईघाईत काढलेल्या फोटो सोबत प्रकाश पोरवाल यांनी चक्क त्यांच्या निवास स्थानी भेट घेउन लवकरच अगरवाल यांचे घोटाळे बाहेर काढू असे आश्वासन सोमय्या यांनी दिले या आशयाची पोस्ट वायरल केली आणि अग्रवाल कुटुंबियांनी या बाबत थेट सोमैया यांना याबाबत खुलासा मागीतला. किरीट सोमैया यांनी सदर प्रकरणी जातीने लक्ष घालुन पोरवाल यांना या बाबत जाब विचारला असता सदर आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याची कबुली पोरवाल यांनी श्री सोमैया यांना दिली असल्याचे किरीट सोमैया यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे. एवढेच नाही तर सोमैया यांनी लोणावळा पोलीस स्टेशन येथे सुद्धा पत्र लिहून सदर बाब कळवली आहे. असे खोटे आरोप करुन व नामवंत राजकिय पुढा-यांसोबत फोटो वायरल करुन सरकारी अधिकारी यांच्यावर दबाव तंत्र आणण्याची ही पोरवाल यांची जुनी पद्धत आता पोरवाल यांना चांगलीच महाग पडणार आहे . यासंदर्भात प्रकाश पोरवाल याच्या विरुद्ध पोलीसात तक्रार करणार असलयाची माहिती नितीन अग्रवाल यांनी दिली आहे. पोरवाल यांनी विविध ठिकाणी अशाच खोटया तक्रार केल्या असून त्यांच्या ह्या तक्रारी ना काही अर्थ नाही अशा या बोगस तक्रारीतून काहीच निष्पन्न होणार नाही उलट पोरवाल यांना खोटी तक्रार केल्याबाबत कायदेशीर कार्रवाईस सामोरे जावे लागणार हे मात्र नक्की अशी माहीती नितिन अग्रवाल यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page