मातंग समाजातील चंद्रकांत दादा लोंढे, आण्णासाहेब कसबे व लोकसेवक युवराज दाखले या तीन रत्नांचा आम्हाला आभिमान-अविनाश लोणारे.

मावळ मराठा न्युज :-पिंपरी,प्रतिनीधी,सर्व सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी तसेच शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असणारे पिंपरी विधानसभेतील इच्छुक लोकप्रतिनिधी चंद्रकांत दादा लोंढे, आण्णासाहेब कसबे व लोकसेवक युवराज दाखले हे समाजातील रत्न आहेत असे मत दिघी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश लोणारे यांनी व्यक्त केले.या रत्नांचा सन्मान स्मृती चिन्ह देऊन दिघी या ठिकाणी करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष अविनाश लोणारे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.यावेळी प्रतिष्ठानचे संजय एडके,शिवाजी डावरे, राजेंद्र मोरे,विठ्ठल उपाडे,संतोष मोहीते,दिपक खुडे,फुलचंद घोडे,भरत गव्हाणे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page