नांगरगाव शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या वतीने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”चा शुभारंभ



मावळ मराठा न्युज :-लोणावळा, ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” या योजनेचा शुभारंभ नुकताच नांगरगाव शिवसेना,युवासेना महिला आघाडी यांच्या वतीने युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे यांच्या वतीने नांगरगाव प्रभागातील महिला भगिनीं साठी आरामधाम या ठिकाणी करण्यात आला.या योजनेचा शुभारंभ शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर व महिला आघाडी शहर संघटिका मनिषा ताई भांगरे यांच्या हस्ते करण्यात आला उपशहर प्रमुख विशाल पाठारे,गावठाण (महिला) विभाग प्रमुख जयश्री काळे, युवासेना उपशहर अधिकारी अतिश भांगरे ,मारुती जाधव, सचिन साठे, प्रशांत जाधव , योगेश दळवी, कपिल दळवी सर्व सामाजिक कार्यकर्ते, जयश्री काळे, प्रतीक्षा भांगरे,नेहा भांगरे, सारिका कापसे , संगिता भांगरे, पूजा भांगरे ,जयेश्री भांगरे, शशिकला ठाकर , भटकंती ग्रुप महारष्ट्र खजिनदार अनिकेत भांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते या योजेनेचा नांगरगाव प्रभागातील महिला भगिनींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन युवा सेना शहर अधिकारी विवेक भांगरे यांनी केलेशिवसेना लोणावळा शहराच्या वतीने लोणावळा शहरातील सर्व प्रभागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हीं योजना राबवण्यात येणार असल्याचे शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर यांनी सांगितले आहे.




