लोणावळा शहरात ६ दिवस मतदार नोंदणी व सरल ॲप अभियानाला उत्सुफुर्त प्रतिसाद


मावळ मराठा न्यूज़, लोणावला:- लोणावळा शहरात मागील ६ दिवस मतदार नोंदणी व सरल ॲप डाऊनलोड करण्याचे अभियान मावळ तालुका निवडणूक प्रमुख श्री रविन्द्रआप्पा भेगडे , मा. नगराध्यक्षा सुरेखा जाधव व लोणावळा शहर निवडणूक प्रमुख श्रीधर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालु होते आज अभियानाच्या अखेरच्या दिवशी१५३९ नवमतदार नोंदणी व ४६९ दुरुस्तीसाठी असे एकुण २००८ नागरिकांचे अर्ज जमा झाले ,तसेच शहरामध्ये घर चलो अभियान राबवण्यात आले व त्यावेळेस २१२४ सरल ॲप डाउनलोड करण्यात आले. मागील सहा दिवसांत लोणावळा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते, युवा मोर्चा तसेच महीला आघाडीच्या सर्व भगिनींनी आपला बहुमूल्य वेळ देऊन अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ,भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर अध्यक्ष अरुण वसंत लाड यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आणि यापुढील काळातही पक्षकार्यासाठी सहकार्यची अपेक्षा व्यक्त केली.




