मला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधी मुळेच मिळाली अमित शाह किवा भाजप मुळे नाही – कलावती बांदुरकर

मावळ मराठा न्यूज़ , यवतमाळ:-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आणि त्यांनी सांगितले की राहुल गांधी एका कलावती नामक महिलेच्या घरी गेले आणि तिची करुण कहाणी त्यांनी संसदेत सांगितली. त्याच कलावतीला अशा परिस्थितीमध्ये  मोदी सरकारने वीज, घर ,शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या दरम्यान भाषण करताना सांगितले, तर दुसरीकडे कलावती बांदुरकर या यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका या गावच्या रहिवाशी असून त्यांच्या घरी राहुल गांधी आले होते आणि त्यानंतर कलावती यांच्याघरी काँग्रस कडून भरीव आर्थिक मदत केली गेली आणि आज त्यांच्या घरी जे साहित्य आहे त्याच्यामध्ये घर आणि इतर साहित्य हे सर्व काँग्रेस काळात मिळाले असे कलावती यांनी सांगितले.  तसेच केंद्रिय मंत्री अमित शहा खोटे बोलतात असेही कलावती बाई बांदुरकर यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page