तज्ञ समितीवरील बेकायदेशीर सदस्य नियुक्ती रद्द करण्यात यावी -नासिरभाई शेख

मावळ मराठा न्युज- लोणावळा नगरपरिषदचा बहुतांश आणि महत्वाचा कारभार हा एक जवळपास दशकापासून मुंबई उच्च न्यायालय तज्ञ समिती मार्फत चालतो अनेक पक्षांनी ही समिती बरखास्त करण्यात यावी कारण कोणतेही जन हिताचं आणि लोणावळा शहराच्या विकासासाठी काम होताना दिसत नाही. त्यांचेवर होणारा खर्च लोणावळा नगरपरिषदेला परवडणारा नाही. आता त्यातही बेकायदेशीर नियुक्त्याचा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष नसीरभाई शेख यांनी उपस्थित करत त्यात लोणावळा नगरपरिषदेच्या परिक्षेत्रातील शास्वत विकास होण्यासाठी जनहित याचिका क्र. ९३/२००७ मधील अंतरिम आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाने तज्ञ समिती गठीत केलेली असून या समितीने नगरपरिषदेला फक्त मार्गदर्शन करावयाचे असे आदेश मा. उच्च न्यायालयाने पारित केलेले आहेत.असे असतांना मागील १ वर्षापूर्वी कै. जस्टीस एस. राधाकृष्णन साहेबांनी श्रीमती ऍड तनु मेहता यांची नियुक्ती तज्ञ समितीचे सदस्य म्हणून केलेली आहे. तसेच ३ ते ४ महिन्यांपूर्वी श्री. गंगाराम मावकर यांची नियुक्ती सुध्दा सदस्य म्हणून या समितीवर करण्यात आलेली आहे. वास्तविक सदरचे पद पदसिध्द नसून मा. न्यायालयामार्फतच त्यांची नेमणूक होणे आवश्यक आहे.तसेच लोणावळा खंडाळा सिटीझन फोरम (वादी) यांचे तर्फे श्रीमती अँड तनु मेहता यांनी सदर केसकामी काम पाहिलेले असतांना त्यांचीच नियुक्ती या समितीवर होणे संयुक्तीक वाटत नाही.तरी या दोन्ही नियुक्त्या रद्द बातल करून त्यांचे नियुक्ती कालावधीनंतर पारित करण्यात आलेले सर्व आदेश/कामकाज स्थगित करण्यात यावे अशी मागणी नासिरभाई शेख यांनी माननीय चेअरमन मुंबई उच्च न्यायालय गठीत तज्ज्ञ समितीला लेखी निवेदनद्वारे केली आहे. सदर प्रकरणी आपले म्हणणं मांडण्यासाठी पुढील तज्ञ समितीचे मिटींगमध्ये वेळ देऊन विषय पत्रिकेवर विषय घेण्यात यावा.अशी ही मागणी नासिर शेख यांनी केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page