मनातील रावण नष्ट करण्याची गरज- वीरसागर महाराज

मावळ मराठा न्यूज़ :- चिंचवड(प्रतिनिधी) रावणाने सीतामाईचे अपहरण करून एक चूक केली. रावणाने सितेला अद्याप स्पर्शही केला नव्हता तरीही रावण त्या चुकीची शिक्षा दरवर्षी भोगताना आपण पाहतो. आज मात्र पृथ्वीवर असंख्य रावण आहे. रावणापेक्षाही भयंकर मनुष्य वागत आहे. रावणापेक्षाही दुष्कर्म करीत आहे. आपल्या मनातील रावणाला नष्ट करा तरच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी केली. असे म्हणता येईल. आपल्यातील रावण नष्ट केल्यास आचरण, मनोविचार आणि व्यक्तित्व सुधारेल. असा विश्वास निर्यापक श्रमण १०८ वीरसागर महाराज यांनी व्यक्त केला.चिंचवड,सुदर्शन नगर येथील श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने १००८ मुनिसुव्रतनाथ भगवान यांचा महामस्तकाभिषेक ट्रस्टच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आयोजित प्रवचन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मुनि श्री १०८ विशाल सागर महाराज,मुनि श्री १०८ उत्कृष्ट सागर महाराज, मुनि श्री १०८ धवल सागर महाराज,अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टचे अध्यक्ष नेमीचंद ठोले, कार्याध्यक्ष शीतल पहाडे, डॉ राकेश जैन, कुमुद शास्त्री,सतीश दोशी,राजेंद्र दोशी,शीतल शहा,अंजली शहा, प्रकाश बडजात्या आदी उपस्थित होते. यावेळी आमदार उमा खापरे यांनी कार्यक्रमास भेट देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी संत शिरोमणि आचार्य १०८ श्री विद्यासागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या प्रतिभा जागृती, चिंचवड़ या वसतिगृहाची घोषणा केली. वीरसागर महाराज पुढे म्हणाले कि, रावण हा राक्षस कुळातील होता मात्र तो राक्षस नव्हता तर त्रिलोकीचा न्यायप्रिय, सत्यवचनी, वीर योद्धा राजा होता. रावण भक्ती करताना कितीही अडचणी आल्या तरी भक्तीत तल्लीन व्हायचा. त्यांच्यापेक्षा कुणीही मोठा भक्त नसेल. एका छोट्याशा चुकीमुळे रावणाचे साम्राज्य नष्ट झाले. आपण आणि त्यांच्यामध्ये तुलना केली करून पहा. त्याने एक लहान चूक केली मात्र आपण तर त्यांच्यापेक्षाही महाभयंकर चुका करीत आहोत.अवगुण नसलेल्या व्यक्तीलाच रावण दहन करण्याचा अधिकार आहे. असे ते शेवटी म्हणाले.विशाल सागर महाराज म्हणाले कि, आपण आपल्या आयुष्यात तक्रारीच करीत असतो परिणामी आपल्या पदरी तक्रारीच पडतात. अडचणींचा पाढा वाचत राहिल्यास आयुष्यात समस्यांची वाढत जाते. जो गुरूंचे ऐकून जीवन व्यतीत करतो त्याचे आयुष्यात परिवर्तन घडून येते. आयुष्य हे एक उत्सव बनतो.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमुद शास्त्री यांनी तर आभार अंजली शहा यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page