भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर व नाणे मावळ मंडल यांच्या वतीने कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन

मावळ मराठा न्युज – लोणावळा,भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर व नाणे मावळ मंडल यांच्या वतीने कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या संकल्प मेळाव्यात संघटनात्मक पक्षकार्य अधिक प्रभावीपणे बळकट करणे, SIR (Special Intensive Revision) अभियान यशस्वीपणे राबविणे, पदवीधर मतदार नोंदणी अभियान, बूथ सक्षमीकरण, आगामी संघटनात्मक उपक्रमांचे नियोजन, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी मा.राज्यमंत्री श्री.बाळाभाऊ भेगडे,पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद , श्री. रामदास आप्पा काकडे, मा. नगराध्यक्ष लोणावळा सौ. सुरेखाताई जाधव, मा. उपनगराध्यक्ष श्री. श्रीधर पुजारी, मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. दत्तात्रय गुंड, श्री. गुलाबराव म्हाळसकर,प्रभारी श्री. प्रशांत भागवत, श्री. प्रशांत ढोरे, श्री. शांताराम कदम, भाजपा सरचिटणीस श्री. श्रीकृष्ण देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सायलीताई बोत्रे, भाजपा लोणावळा–नाणे मावळ मंडल महिला आघाडी अध्यक्ष श्री., परीजाताई भिलारे युवा मोर्चा लोणावळा–नाणे मावळ अध्यक्ष श्री. माऊली गुंड, नाने मावळ श्री सरचिटणीस राजाभाऊ खळदकर व अमित गंदे,सौ. बिंदाताई गणात्रा, सौ. रेशमाताई पठारे, श्री. दत्तात्रय येवले, श्री. राजाराम शिंदे, श्री. रणजीत काकडे, श्री. रामदास गाडे, श्री. गणेश ठाकर, तसेच तालुक्यातील व नाने मावळ मंडळातील सर्व कार्यकर्ते महिला वर्ग व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page