लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दी शाळेमधील एकूण ६० विद्यार्थी,विद्यार्थिनीं यांना स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्राचे व पारितोषिक वितरण










मावळ मराठा न्युज – लोणावळा,(श्रावणी कामत हिसकडून)महाराष्ट्र शासनाच्या स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) उपक्रमा अंतर्गत इयत्ता आठवी नववी सन २०२४ -२०२५ व २०२५ -२०२६ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र वितरण व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्याबाबत प्राप्त आदेशानुसार दिनांक ०५/०८/२०२६ रोजी सकाळी १२ .०० ते१३ .०० वाजता लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणावळा नगर परिषद शाळा उर्दू शाळा व रामकृष्ण मोरे हायस्कूल खंडाळा शाळेमधील एकूण ६० विद्यार्थी विद्यार्थिनीं यांनी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्राचे व पारितोषिक वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, कायद्याचे पालन ,पोलीस व नागरिकांमधील मैत्री ,महिला व बाल सुरक्षा ,तसेच सायबर सुरक्षितता व नागरिकांची कर्तव्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.अशी माहिती लोणावळा शहर पो. स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन दिनकर पाटील यांनी दिली.



