रोटरी क्लब ऑफ लोणावळा डिस्टिक ३१३१ झोन २ रोटरी क्लब्स तर्फे भव्य रक्तदान शिबिर










मावळ मराठा न्युज – लोणावळा -रोटरी क्लब ऑफ लोणावळा डिस्टिक ३१३१ झोन २ रोटरी क्लब्स तर्फे भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन दि ०३/०८/२०२६ रोजी लोणावळा कॉलेज येथे करण्यात आलेले होते. District ३१३१ चे गव्हर्नर DG नितीन ढमाले यांचा दि ०३/०८/२०२६ रोजी वाढदिवसाच्या निमित्त हा कार्यक्रम रबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत हिमोग्लोबिनची देखील तपासणी करण्यात आली. रोटरी क्लबच्या माध्यमातून असे अनेक उत्तम उपक्रम आम्ही कॉलेजसाठी पुढे देखील घेऊ अशी आश्वासन प्रमुख पाहुणे DG नितीन ढमाले यांनी यावेळी दिले. रोटरी क्लब च्या अध्यक्षा रो. ऍड. मोनाली कुलकर्णी-शेलार यांनी कॉलेज साठी उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम कॉलेज मध्ये रबविणार असल्याची माहिती दिली व प्राचार्य देशमुख सिरांनी देखील सहकार्य करणार असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रमास सिनियर रोटेरिअन श्रीकृष्ण वर्तक, धीरूभाई कल्याणजी, कौस्तुभ दामले, IPP विजया कल्याण, PP नारायण शरवाले, नितीन कल्याण, पुंडलिक वानखेडे, रवींद्र कुलकर्णी, आशिष मेहता, तसनीम भोरी हे रोटेरिअन उपस्थित होते. रो. रवींद्र कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.



