सेंट ॲन्स पुर्व- प्राथमिक शाळेचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ उत्साहात संपन्न:


मावळ मराठा न्यूज:- चिंचवड,(प्रतिनिधी)सेंट ॲन्स पुर्व प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन’ चिंचवड येथील रामकृष्ण मोरे’सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विंग कमांडर पी. व्ही. सी पाटील उपस्थित होते.तसेच कार्यक्रमासाठी सौ. सुप्रिया चव्हाण पाटील, प्रो. डी. आर. करनुरे, डॉ. भरत चव्हाण पाटील, सौ. श्वेता भरतचव्हाण पाटील यांची उपस्थिती लाभली. सेंट ॲन्स पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती शिंदे,विद्यानंद भवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. जयाश्रीनिवास यावेळी उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.प्रमुख पाहुण्यांचा व उपस्थित मान्यवरांचासत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. रश्मी नायर व सौ. सुमन सरिन यांनीसादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रीती शिंदे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केल्यानंतर विविध क्षेत्रातअतुलनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध उपक्रमात उल्लेखनीयकामगिरी केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शनकेले.विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये, गीत-गायन व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आभार प्रदर्शनविद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ गीताने व आभार प्रदर्शनाने झाली.




