शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी व अति ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना वह्या,गोष्टींची पुस्तके भरुन उत्कष्ट प्रतीच्या दप्तरांचे वाटप

मावळ मराठा न्युज शिवसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज दि. २० जून २०२६ रोजी मावळ तालुक्यातील आदिवासी व अति ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तसेच वह्या, गोष्टींची पुस्तके भरुन अत्यंत चांगल्या प्रतीच्या दप्तरांचे वाटप करण्यात आले. गेल्या जवळपास दिड महिन्यांपासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी केलेली होती. दप्तरांसाठी निधी गोळा करणे, दप्तरांसह सर्व साहित्य तयार करून घेणे इ. सर्व कामांसाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे.सकाळी प्रतिवर्षी प्रमाणे वृक्षारोपण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.जवळपास ५० दुर्गम भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी दप्तरे मिळणे करिता अर्ज आले होते. एक हजार दप्तरं वाटण्याचा संकल्प तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.यावेळी बोलताना शिवसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी संस्थेच्या भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच नुकत्याच सुरू केलेल्या *’आम्ही पालक ‘* या उपक्रमा संदर्भातही माहिती दिली.संस्थेच्या कार्यकर्त्या शुभा मराठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून *चलो कुछ अच्छा करें* असे म्हणत सर्वांना शिवसेवा प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी, विशेषतः आशुतोष जोशी, नीलाक्षी जोशी, आशुतोष आठल्ये, रितेश गुप्ता, भगवान गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांचे विशेष योगदान या उपक्रमाला लाभले.सर्व ग्रामिण भागातील शाळांचे प्रतिनिधी व विद्यार्थी यांनी या उपक्रमा बद्दल कृतज्ञता व समाधान व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page