खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावला नगरपरिषदेत आढावा बैठक संपन्न


मावळ मराठा न्यूज़:-लोणावला,मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागाच्या यात एम् एस आर डी ए, आय आर बी,रेल्वे,लोनावला नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत लोनावला नगरपरिषदेची आढावा बैठक आज लोनावला नगरपरिषद येथे संपन्न झाली यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव ,माजी उपनगरध्यक्ष श्रीधर पुजारी ,सूर्यकान्त वाघमारे ,भाजपाचे विधानसभा निवडणूक अध्यक्ष रविंद्र भेगडे,तालुका अध्यक्ष भाऊ गुंड,प्रमोद गायकवाड़,शहर पोलिस निरीक्षक सीताराम डूबल ग्रामीण चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ ,शरद हुलावले,राजु खांडभोर,अरुण लाड,कमलशिल म्हस्के ,राजु बच्चे,दिलीप दामोदर,ललित सिसोदिया,आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली .अडचण ठरणाऱ्या प्रकल्प यांचेवर पाठपुरावा करुन लवकरच मार्ग काढला जाईल असा विश्वास खासदार बारणे यांनी उपस्थिताना दिला .यावेळी लोकल गाड्या फेरया आणि एक्सप्रेस थाम्बा खंडाला ऐवजी लोनावला व्हावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केलि .यावेळी खासदार यांनी ठोस अशी भूमिका न घेता मी खुप पाठपुरावा केला आहे परन्तु त्याला हवे तसे यश मिळाले नाही अशी खंत देखील त्यानी व्यक्त केलि .वेळ पडल्यास मी देखील जनतेसोबत आंदोलन अग्रेसर असेल अशी ग्वाही दिली . अवजड वाहने गावात येवून नाहक बळी जात आहेत त्यामूळे दोन टोल नाके अगदी जवळ्च असल्याने एक टोल नाक्यावरुन टोल बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी शहर पोलिस निरिक्षक डूबल यांनी सीसी टिवी कॅमेराचा विषय पालिकेकडे प्रलंबित असल्याचे नमुद केले.तर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी कार्ला फाटा वाहतुक कोंडी डबल टोल बद्द्लचा मुददा खासदार बारणे याचेसमोर उपस्थित केला.




