लोणावळ्यात शहर हद्दीत एकाच दिवशी तीन चार ठिकाणी चोऱ्या

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,काल रात्री ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन, लोणावळा शाखा कार्यालय यथे चोरी झाली. ऑफिस बाजार येथे सोनार गल्ली, अलंकार फोटो स्टूडियो चे वर सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला. फेडरेशनचे सल्लागार दादा गोसावी,खजिनदार दत्ता केदारी,सुलतान शैख , सचिव संजय गुरव व सहकारी यानी लोणावळा शहर पोलीस स्टेशननला रितसर तक्रार केली, फेडरेशन चे अध्यक्ष दिलीप पवार यांनी मावळ मराठा न्युजला सदर माहिती दिली आहे.vचोरानी ऑफिस चे कुलूप तोडून व लोखंडी कपाट फोडून त्यातील सामान बाहेर फेकुन दिले, कपाट मध्ये काहीही मिळाले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याच प्रमाणे नाकोडा येथे देखील श्री गणेश आर्टस् येथे देखील चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page