लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई :,लायन्स पॉईंटवर हुक्का विक्री करणाऱ्या दोन जणांवर तर वेळेचे बंधन न पाळणाऱ्या ६ जणांवर खटले

मावळ मराठा न्युज लोणावळा :-दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्री अडीच वाजता चे सुमारास मौजे आतवण, ता. मावळ, जि.पुणे गावचे हददीत टाईगर पाईन्ट येथे त्याचे मालकीचे दुकानामध्ये इसम नामे १) संतोश शंकर आखाडे, वय २७ वर्षे, रा.रामनगर भुशी लोणावळा, ता. मावळ, जि.पुणे, व वेटर नामे २) दिपक भानु हिरवे, वय २७ वर्षे, रा. देवघर, ता. मुळशी, जि.पुणे यांनी सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिकरित्या मानवी जिवीतास धोका व शासनाने बंदी घातलेले साहित्य कब्जात बाळगल्याने मिळुन आल्याने त्याचे विरूध्द सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम २००३ चे सुधारीत अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ) व २१ (अ) प्रमाणे त्याचे विरूध्द माझी सरकार तर्फे फियांद आहे वगैरे मजकुर चे फिर्यादी जबाबावरुन गुन्हा रजि दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट में कोटांत दाखल करण्याची तजबिज ठेवली असुन गुह्याचा पुढील तपास पो नि धुमाळ सो यांचे तोंडी आदेशान्वये पोहया, पवार १९८२ सो हे करीत आहेत. तसेच या व्यतिरिक्त टायगर पॉइंट येथे उशिरा पर्यंत दुकाने सुरू असल्याबाबत ६ इसमावर ३३ (w) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच रात्रीचे वेळी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या ३ पर्यटकांवर देखील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाईत हुक्का पिण्याचे पाईपसह पॉट नग ७ प्रत्येकी किंमत,किंमतीचे हुक्कासाठी लागणारे प्लॅस्टीकचे फिल्टर,हुक्का पिणेसाठी वापरण्यात येणारे अब्जल कंपनीचे डब्बल अॅपल फलेवरचे २ पैकेट आणि हुक्का पिणेसाठी वापरण्यात येणारे अब्जल कंपनीचे मिंन्ट फलेवरचे २ पैकेट असे १४ ,६५० साहित्य जप्त करण्यात आले.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे, सहा पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली API सचिन राऊळ, PSI शुभम चव्हाण, psi भारत भोसले, पोहवा सागर बनसोडे, अंकुश नायकुडे, नितेश कवडे, सचिन गायकवाड, पोना दत्ता शिंदे, पोकॉ रहीस मुलाणी, सुभाष शिंदे, सिद्धेश वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page