वलवण प्रभाग क्रमांक ३,आरक्षणावर एकाच ‘कुटुंबाने मारला डल्ला हा तर भारतीय लोकशाही वर हल्ला







“मावळ मराठा न्युज – लोणावळा,वलवण प्रभाग क्रमांक ३ मध्ये दोन आरक्षित जागा — महिला राखीव आणि अनुसूचित जाती (SC) राखीव — या दोन्ही जागांवर एकाच कुटुंबातील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याने राजकीय वादंग पेटले आहे.एनसीपी (सुनील अण्णा गट) यांनी दिलेल्या AB फॉर्मनुसार: श्वेता माधव पाळेकर — अनुसूचित जाती राखीव जागा,आणि श्रीमती लक्ष्मी नारायण पाळेकर — महिला राखीव जागाया दोन्ही जागा एकाच घरात गेल्याने आरक्षणाचे प्रतिनिधित्व संपून कुटुंबीय सत्ताधिकार वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा त्या प्रभागात रंगली आहे.आरक्षणावर ‘कुटुंब वर्चस्व’ — प्रतिनिधित्वा ऐवजी घराणेशाही,प्रभागातील नागरिक व पक्षकार्यकर्त्यांमध्ये सर्वात मोठी नाराजी आहे. —“आरक्षणाचा उद्देश काय? तो येथे साध्य होताना दिसत नाही.SC तसेच महिला आरक्षण या दोन्ही जागा एकाच घरात देणे म्हणजे सार्वजनिक संधी कुटुंबाच्या तिजोरीत बंद करणे,असा आवाज लोकांमधून उठत आहे.जन्माने SC असली तरी श्वेता पाळेकर आता विवाहाने दुसऱ्या सामाजिक पार्श्वभूमीत गेली आहे. कायद्याने पात्र असली तरी स्थानिक SC बंधूंमध्ये मोठा प्रश्न उभा राहिला आहे:त्यांची संधी हुकल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.समाजातील खऱ्या समस्यांना आवाज देणारी व्यक्ती हवी होती,परंतुयेथे कुटुंबीय समीकरणे जुळवली गेल्याचे चित्र आहे. —त्यामुळे अशी नाराजी SC मतदारांमध्ये दिसून येते.या प्रभागात नेपोटिझम विरुद्ध प्रतिनिधित्व — तळागाळातील महिलांची संधी हिरावली गेली त्यांना खऱ्या आणि स्थानिक महिला राखीव जागा ही नवी महिला नेतृत्व निर्माण करण्याची संधी होती.परंतु तीही त्याच कुटुंबातील महिलेला देण्यात आल्याने महिला कार्यकर्त्यांच्या आशा अपेक्षावर पाणी फिरले आहे.“आरक्षण म्हणजे कुटुंबीय ‘डबल सीट’ नव्हे”, असा सूर महिलांमध्ये दिसतो. पक्षकार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा व भ्रमनिरासमहिनोंमहिने कष्ट करूनही तिकीट वाटपात तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिलीच नाही, अशी भावना सर्वत्र झाली आहे.कार्यक्षम कार्यकर्त्यांना बाजूला काढून ‘कुटुंब प्राधान्य’ दिल्याने NCPचा स्थानिक संघटनात्मक राग उफाळून आल्याचे चित्र या विभागात आहे.एक वरिष्ठ कार्यकर्ताने स्पष्ट शब्दात याचा राग व्यक्त केला.“दोनही जागा जात-लिंग आरक्षणाच्या… पण कार्यकर्त्यांसाठी एकही जागा नाही. सर्व जागा एकाच कुटुंबात”यामुळे आरक्षणाच्या आदर्शांचा ‘विश्वासघात’ झाल्याचे चित्र आहे.SC आणि महिला आरक्षणाचा उद्देश असताना —प्रतिनिधित्व, सक्षम नेतृत्व, आणि संधी—हे सर्व बाजूला ठेवून कुटुंबीय राजकारणाला लाभ मिळवून देण्यासाठी या दोनही जागांचा वापर झाल्याचा आरोप लोकांमध्ये होत आहे.नागरिकांचा थेट सवाल:“हा आरक्षणाचा उपयोग आहे की आरक्षणाचा दुरुपयोग ?” सर्व घटनांनी वलवण प्रभागात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत,,* आरक्षण कोणासाठी?* लोकप्रतिनिधी कोण?* आणि सत्ता एका घरातच का केंद्रित होते आहे?प्रतिनिधित्वात घराणेशाही नको; निर्णय लोकशाहीने घ्यावेत.”यात सरळ सरळ लोकशाही चा गळा घोटला जात आहे.आगामी निवडणुकीत मतदार या प्रश्नांना उत्तर देईल, आणि कुटुंब राजकारणाला ‘हो’ की ‘नाही’, हे प्रभागाची जनता ठरवेलच.



